Cancer Care Network Services
राज्यव्यापी कर्करोग उपचार, निदान, संशोधन, शिक्षण आणि समुदाय पातळीवरील सेवा
यांचे चार-स्तरीय (L1–L4) एकात्मिक मॉडेल.
Cancer Care Network Services

शिखर कर्करोग संस्था
Apex Cancer Institute

प्रगत उपचार केंद्रे
District Cancer Care Hubs

निदान व डे-केअर
Diagnostic & Day Care Spokes

समुदाय पातळी उपक्रम
Community Outreach & Palliative Care
L1 – शिखर कर्करोग संस्था (Apex Cancer Institute)
L1 स्तरावरील संस्था या राज्यातील सर्वोच्च कर्करोग उपचार व संशोधन संस्था असतील. या स्तरावर उच्चस्तरीय निदान, प्रगत उपचार, संशोधन, शिक्षण आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवा उपलब्ध असतील. राज्यात टाटा मेमोरियल हॉस्पिटल हे L1 स्तरावरील शिखर संस्था म्हणून कार्यरत राहील.
मुख्य सेवा
- सुपर स्पेशालिटी उपचार
- Advanced Oncology – सर्व शाखा
- संशोधन प्रयोगशाळा (Research Laboratories)
- उच्चस्तरीय वैद्यकीय प्रशिक्षण
- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहयोग
- Nuclear Medicine सुविधा
L2 – प्रगत कर्करोग उपचार केंद्रे (District Cancer Care Hubs)
L2 स्तरावरील केंद्रे ही राज्यातील प्रमुख प्रादेशिक कर्करोग उपचार संस्था असतील. येथे निदान, शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिओथेरपी आणि संशोधन सुविधा उपलब्ध असतील.
पायाभूत सुविधा (Infrastructure)
- एकूण १४० खाटा (१०० उपचार खाटा + ४० Day Care खाटा)
- ३ मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स + २ मायनर ऑपरेशन थिएटर्स
- Dual Energy LINAC + Single Energy LINAC
- MRI, PET-CT (PPP आधारित), CT Scan
- CT Simulator, Brachytherapy
- Advanced Pathology Laboratory
- Mammography Unit
वैद्यकीय सेवा
- Surgical Oncology – प्रमुख शस्त्रक्रिया सेवा
- Medical Oncology – केमोथेरपी
- Radiation Oncology – रेडिओथेरपी
- Nuclear Medicine – न्यूक्लियर मेडिसिन
- Palliative Care – पॅलिएटिव्ह केअर
वैद्यकीय शिक्षण कार्यक्रम
- MD / MS – पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण
- DM / MCH – सुपर स्पेशालिटी
- DNB कार्यक्रम
- Fellowship Programs
L3 – निदान व डे-केअर सेवा केंद्रे (Diagnostic & Day Care Spokes)
L3 स्तरावरील केंद्रे नागरिकांना स्थानिक पातळीवर प्राथमिक कर्करोग उपचार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विकसित करण्यात येत आहेत.
सेवा
- Day Care Chemotherapy – डे-केअर कीमोथेरपी
- Localized Radiotherapy – स्थानिक रेडिओथेरपी
- Palliative Care – उपशामक उपचार
- मानसिक आधार सेवा
- Basic Diagnostics – प्राथमिक निदान
- जनजागृती कार्यक्रम
पायाभूत सुविधा
- ३० ते ५० Day Care Beds
- Single Energy LINAC
- CT Simulator
- Mammography
- Basic Pathology Lab
- १ Minor Operation Theatre
L4 – समुदाय पातळी उपक्रम (Community Outreach & Palliative Care)
L4 स्तर हा थेट गावपातळीपर्यंत पोहोचणारा उपक्रम असून येथे प्रारंभिक तपासणी, जनजागृती आणि terminal pain management यावर भर दिला जाईल.
समुदाय सेवा
- ग्रामीण आरोग्य शिबिरे
- प्रारंभिक कर्करोग तपासणी
- Palliative / Terminal Pain Management
- ASHA व ANM यांच्यामार्फत जनजागृती