Mahacare Foundation

MAHACARE Launch Curtain

उद्घाटन

MAHACARE

Website Launch

श्री. हसन मुश्रीफ

संचालक
मंत्री, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई

श्री. प्रकाश आबिटकर

संचालक
मंत्री, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई

श्रीमती माधुरी मिसाळ

संचालक
राज्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई

श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर

संचालक
राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंवई

MAHACARE –

महाराष्ट्रासाठी आरोग्य क्षेत्रातील ऐतिहासिक उपक्रम

महाराष्ट्रात वाढत्या कर्करोग रुग्णसंख्येचा विचार करून महाराष्ट्र शासनाने राज्यव्यापी कर्करोग उपचार सेवा प्रणाली विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

“महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन (MAHACARE Foundation)” या Section-8 संस्थेच्या माध्यमातून राज्यभर अत्याधुनिक कर्करोग उपचार सुविधा, संशोधन केंद्रे, वैद्यकीय शिक्षण आणि जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

MAHACARE हे नागरिक, डॉक्टर, संशोधक आणि आरोग्य यंत्रणा यांना एकत्र आणणारे महाराष्ट्रातील सर्वात व्यापक आरोग्य नेटवर्क ठरणार आहे.

MAHACARE ची आहे साथ ,
करूया कॅन्सरवर मात

कर्करोग – सार्वजनिक आरोग्यासमोरील वाढते आव्हान

भारतातील परिस्थिती

भारतात दरवर्षी अंदाजे 14 ते 15 लाख नवीन कर्करोग रुग्ण आढळून येतात. बदलती जीवनशैली, तंबाखू सेवन, प्रदूषण आणि उशिरा होणारे निदान यांमुळे कर्करोगाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे.

महाराष्ट्रातील परिस्थिती

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कर्करोग रुग्ण असलेल्या राज्यांपैकी एक आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये निदान सुविधा, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि उपचार केंद्रांची कमतरता ही मोठी आव्हाने आहेत. MAHACARE च्या माध्यमातून ही दरी कमी करून प्रत्येक नागरिकापर्यंत आधुनिक उपचार सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

MAHACARE ची आवश्यकता का?

राज्यातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्या जिल्ह्यात किंवा जवळच्या परिसरात गुणवत्तापूर्ण कर्करोग सेवा उपलब्ध व्हावी यासाठी एकात्मिक आणि सक्षम आरोग्य नेटवर्क उभारण्याची गरज निर्माण झाली होती.

मोठ्या शहरांवरील उपचाराचा ताण कमी.

अद्ययावत निदान सुविधा.

संशोधन आणि नवोपक्रमाला चालना.

वैद्यकीय शिक्षण अधिक सक्षम.

वेळेवर उपचार आणि मार्गदर्शन उपलब्ध.

उपचारासाठीचा आर्थिक व मानसिक भार कमी.

रुग्ण सहाय्य सेवा

रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना उपचार प्रक्रियेदरम्यान सर्वांगीण सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी विविध सुविधा विकसित करण्यात येत आहेत.

उपचार
मार्गदर्शन

मानसिक आधार
सेवा

आर्थिक सहाय्य माहिती

हेल्पलाइन
सेवा

त्रिस्तरीय कर्करोग उपचार प्रणाली

L1 – शिखर कर्करोग संस्था

उच्चस्तरीय निदान, प्रगत उपचार, संशोधन आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या संस्था.

L2 – प्रगत कर्करोग उपचार केंद्रे

शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी, केमोथेरपी आणि मेडिकल एज्युकेशन सुविधा असलेली प्रादेशिक केंद्रे.

L3 – निदान व डे-केअर सेवा केंद्रे

स्थानिक पातळीवर प्राथमिक उपचार, डे-केअर केमोथेरपी, रेडिओथेरपी आणि जनजागृती सेवा उपलब्ध करून देणारी केंद्रे.

डिजिटल आरोग्य व्यवस्थापन प्रणाली

राज्यातील सर्व L1, L2 आणि L3 केंद्रांना जोडणारी Single Cloud Command & Control Centre प्रणाली विकसित करण्यात येत आहे.

डिजिटल रुग्ण माहिती

उपचार ट्रॅकिंग

Telemedicine सुविधा

Data Driven Healthcare Planning

संशोधन आणि नवोपक्रम

MAHACARE अंतर्गत कर्करोग संशोधन, Clinical Trials आणि आधुनिक उपचार तंत्रज्ञान विकसित करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.

मुख्य क्षेत्रे

जनजागृती आणि प्रतिबंधात्मक आरोग्य

कर्करोगाविरुद्धची लढाई केवळ उपचारांपुरती मर्यादित नसून जागरूकता आणि प्रतिबंध यांवरही आधारित आहे.

ग्रामीण आरोग्य
शिबिरे

महिला तपासणी
अभियान

तंबाखूविरोधी
मोहीम

शालेय आरोग्य
अभियान

नियमित तपासणी
व जनजागृती

एक सक्षम, निरोगी आणि कर्करोगमुक्त महाराष्ट्रासाठी सामूहिक प्रयत्न

MAHACARE हा महाराष्ट्र शासनाचा नागरिककेंद्रित आरोग्य उपक्रम असून राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत गुणवत्तापूर्ण कर्करोग सेवा पोहोचविण्यासाठी कटिबद्ध आहे.

Scroll to Top