ABOUT MAHACARE
महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी सर्वसमावेशक, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार सेवा
उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल.
९ केंद्रे
राज्यभर कार्यरत
MAHACARE ची स्थापना व उद्देश
महाराष्ट्रात वाढत्या कर्करोग रुग्णसंख्येचा विचार करून महाराष्ट्र शासनाने राज्यव्यापी कर्करोग उपचार सेवा प्रणाली विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
“महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन (MAHACARE Foundation)” या Section-8 संस्थेच्या माध्यमातून राज्यभर अत्याधुनिक कर्करोग उपचार सुविधा, संशोधन केंद्रे, वैद्यकीय शिक्षण आणि जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
MAHACARE हे नागरिक, डॉक्टर, संशोधक आणि आरोग्य यंत्रणा यांना एकत्र आणणारे महाराष्ट्रातील सर्वात व्यापक आरोग्य नेटवर्क ठरणार आहे.
MAHACARE ची आवश्यकता का?
महाराष्ट्रात कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणामुळे सर्वसमावेशक, विकेंद्रित आणि गुणवत्तापूर्ण
आरोग्य व्यवस्थेची तातडीची गरज निर्माण झाली आहे.
प्रारंभिक लक्ष्य
निदान वेळेच्या टप्प्यानुसार रुग्ण प्रमाणामधील बदल हेच MAHACARE चे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
सद्यःस्थिती
MAHACARE लक्ष्य
Target
“लवकर निदान म्हणजे अधिक प्रभावी उपचार आणि रुग्णांच्या जगण्याचे वाढलेले प्रमाण.”
Government Initiative
शासकीय उपक्रम
राज्यव्यापी कर्करोग सेवा नेटवर्क
दृष्टी व ध्येय
"कर्करोगमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने
एकत्रित प्रयत्न"
आपल्या सहभागातून, जागृतीतून आणि सहकार्यातून आम्ही राज्याला
निरोगी भविष्याकडे नेऊ शकतो.